विदर्भाची काशी मार्कंडादेव जि.गडचिरोली India tourisam place

विदर्भाची काशी म्हणून ख्याती प्राप्त असलेले चामोर्शी तालुक्यातील शिल्प कलेने नटलेला मार्कंडेश्वर आजही जिल्ह्यात वैभव शाली संस्कृती होती याची ऐतिहासिक साक्ष देणारे आहे . १२०० वर्षापासून चार्मोर्शी पासून अवघा ६ किमी अंतरावर मार्कंडा या गावी एका खडकावर हे मंदिर भागानावस्थेत डौलाने उभा आहे .या ठिकाणी महामुनी शिनी मार्कंडेऋषींनी शिवाची घोर तपश्चर्या केली व ते मृतुन्जय झाले , अशी आख्यीयिका आहे .तेव्हा पासून पासून तेथील शिव मंदिरास मार्कांडेश्वर असे नाव पडले आहे . India tourisam place

मार्कांडेश्वर शिवोपासक होते .याचे काही ऐतिहासिक दाखले मिळतात .येथील मुख्य मंदिरात व अन्य भागात शिवलिंगाची स्थापना केल्याचे आढळतात .यावरून हे शिव मंदिर मार्कंड ऋषींनी तपश्चर्या करण्यापूर्वीचे असावे , असे वाटते . तर मार्कंड ऋषींच्या तपश्चर्याने मुळच्या शिव मंदिरात मार्कांडेश्वर मूर्ती कुठेच दिसत नाही .जेव्हा यात्रे करू येथे येत्तात तेव्हा या ऋषींची मूर्ती कुठेच दिसत नाही असा प्रश्न पडतो यासठी रामप्रसाद महाराज विश्वस्त धर्मशाळेच्या वतीने विश्वस्त मंडळाच्या मार्कांदेश्वर मंदिर बांधण्यात आले असून तेथे मार्कांडेश्वर मूर्तीची प्रतीष्टापणा करण्यात आली आहे . India tourisam place
मार्कंडा या गावात प्रवेश करताच मार्कांडेश्वर देवळाच्या उंच अश्या प्रेक्षणीय घुमाटाचे दर्शन होते .हे घुमट पाहताच मंदिर अति प्राचीन असून याची साक्ष पटते .पूर्वे कडे असलेले वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र मनाला मोहून टाकते. दुसरे वैशिष्ट असे कि चामोर्शी वरून दक्षिणे कडे वाहणारी वैनगंगा , पिंपळ घाट ते देवटोक या ठिकाणी उत्तरवाहिनी होऊन पुन्हा दक्षिणमुखी झाल्याचे दिसते .या मुळे उलटी गंगा म्हणून या स्थळास धार्मिकतेचे विशेस स्थान मानले जाते या संदर्भात प्राचीन आख्यायिका आहे . वास्तविक हे देवस्थान ज्या ठिकाणी आहे .तो परिसर टेकडीचा असून काही ठिकाणी खडकाळ भूभाग आहे .त्या मुळे वैनगंगा दक्षिणेस वाहत असताना समोरासमोरील उंच भागामुळे उत्तरवाहिनी होऊन नंतर ती पूर्ववत होऊन दक्षिण प्रवाही झाली आहे . असे असले तरी सूर्योदयाच्या वेळी येथील आनंद काही वेगळाच असतो .कारण मंदिराची बांधणीच अशी झाली आहे कि , सूर्योदयाचे पहिले किरण मुख्य मंदिराच्या पूर्वेकडील दारातून प्रवेश करून गाभार्यातील शिवलिंगावर पडते .या वरून मंदिरायाच्या बांधकामात किती कल्पकता आहे हेही दिसते .
India tourisam placeRead more मुख्य मंदिर हे अंतर्बाह्य शिल्पांनी आणि बेल्बुत्यानी अलंकृत आहे .गाभार्यात यमधर्म आणि मार्कांडेस्वर ऋषींची मुर्ती हाथ जोडून उभी आहे . मागे चतुरस्त अन्नपूर्णा देवीची मुर्ती आहे .पंच धातूची पंचमुखी मुर्ती बाजूला ठेवली आहे .. गाभार्यात नागकन्या , डमरूधारी , शंकर - पार्वती ,गणपती ,कालभैरव ,शस्त्रधारी चंद्र यांच्या देखण्या मुर्ती आहेत .आतील शिल्पा खंडावर लक्ष्मी , रामायणातील दृश्य ,ब्रम्हा आदीच्या प्रतिमा कोरल्या आहेत . मंदिराच्या बाहेरील भागात सुमारे ४०० शिल्प आहेत .अपसरा ,नृत्यांगना यांची अदाकारी बघताना आपण वेगळ्याच भाव विश्वात रमतो .शिल्प कराची स्थुती करावे असे वाटते .मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , ओटे आदी सोयी केल्या आहेत .मंदिर आणखी सुशोभित व्हवे असे प्रयत्न चालू आहेत .या मंदिराला केंद्राने पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी दिली आहे .